उज्जवला योजनेअंतर्गत कुटुंबांला गॅस वाटप

3

लोणी काळभोर, कदमवाकवस्ती: दि.२३ एप्रिल २०२०                                                                  प्रभागातील भाजपा नेते चित्तरंजन गायकवाड यांच्या प्रयत्नाने पंतप्रधान उज्ज्वला योजने अंतर्गत आज (दि.२३) रोजी गरीब कुटुंबांना गॅस वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोठी घोषणा केली आहे.

पंतप्रधान उज्ज्वला योजने अंतर्गत तीन महिन्यांपर्यंत एलपीजी घरगुती गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहे. गरीब कुटुंबातील महिलांपर्यंत गॅस पोहोचवण्यासाठी मोदी सरकारने १ मे २०१६ रोजी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची घोषणा केली आहे. या योजनेच्या अंतर्गत महिलांना मोफत गॅस जोडणी दिली गेली व चुलीवर जेवण करताना महिलांना त्रास होतो त्यामुळे श्वासाचेही आजार जडतात. यातून गरीब महिलांची सुटका व्हावी व त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचवावा यासाठी मोदी सरकारनं प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस जोडणी योजनेच्या माध्यमातून दारिद्रय रेषे खालील योजनेतील कार्ड धारकांना मागील काळामध्ये मोफत गॅस वाटप केले.

आता या लॉकडाऊन च्या काळामध्ये या लाभार्थ्यांना केंद्र सरकारने तीन महिने मोफत गॅस भरून देणार आहेत. आज पहिल्या महिन्याचा गॅस भरून दिला व उर्वरित दोन महिन्याचे गॅस ही असेच भरून देणार आहोत. असे भाजपा नेते चित्तरंजन गायकवाड यांनी न्यूज अनकट” शी बोलताना सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा