पुणे, ९ जुलै २०२० : पुणे शहरात रामभाऊ म्हाळगी यांच्या जयंतीनिमित्त, शनिवार पेठ येथील स्व.रामभाऊ म्हाळगी नागरी सुविधा केंद्रातर्फे खासदार गिरीश बापट, आमदार मुक्ता टिळक यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी अधिकाऱ्यांना आरोग्य किट, मास्क, आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्या, हॅन्डग्लोज(हातमोजे) या गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या वस्तूंचा अनेक महापालिका कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबवण्यात आला असल्याचे नगरसेविका अँड. गायत्री रत्नदीप खडके (सूर्यवंशी) यांनी सांगितले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे आणि आपल्या तोंडाला मास्क लावावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमासाठी कसबा विश्रामबाग क्षेत्रिय कार्यालयाचे वॉर्ड ऑफिसर आशिष म्हाडदळकर, काशीनाथ गांगुर्डे, आरोग्य निरीक्षक सुनील मोहिते, थोपटे, म्हागरे, रविराज बेंद्रे, उद्यान विभागाचे पंडित, आनंद कुंटे, मेघना कुलकर्णी, दत्ता परभाणे, विनायक भगत असे अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी अयवळे