एक हजार कुटुंबाना रोगप्रतिकार शक्ती औषधाचे वाटप

दौंड, दि. ३० जून २०२०: दौंड तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या युवा सतीश भापकर व रणजीत थोरात यांनी कोरोनाच्या सोबत सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान सहज सोपे करण्यासाठी व त्यापासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजनांच्या माहितीसह कुरकुंभ येथे एक हजार कुटुंबांना रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या होमिओपॅथी औषधांचे वाटप केले.

सध्या लॉक डाऊनच्या नियमात शिथिलता येत असल्याने नागरिकांनी आपल्या उद्योग धंद्यांच्या माध्यमातून रस्त्यावर गर्दी करण्यास सुरु केली आहे. त्यामुळे विविध ठिकाणी होणाऱ्या प्रवासाच्या वाढणाऱ्या प्रक्रियेने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस लक्षणीय होत असल्याचे आढळून येत आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रासाठी विविध प्रकारच्या नियमावली ठरवून दिल्या जात असल्यातरी याचे पालन होताना दिसून येत नाही.अनेक दिवसांच्या ठप्प पडलेल्या व्यवसायाला पुन्हा नव्याने सुरु करण्याची घाई प्रत्येकाला झालेली असल्याने बाजारपेठा गर्दीने फुलू लागल्या आहेत अश्यातच या सर्व संकटात स्वतःला व कुटुंबाला या महामारीपासून सुरक्षित ठेवण्याचे आवाहन या तरुण डॉक्टरांच्या कडून करण्यात येत आहे.कुरकुंभ येथील प्राथमीक आरोग्य सेवेतील आशा वर्कर यांच्या माध्यमातून या एक हजार कुटुंबांना औषधाचे वाटप करण्यात आले आहे.

शहरी व ग्रामीण अश्या दोन्ही ठिकाणी प्रकर्षाने नवीन रुग्ण आढळून येत असल्याने परिसरातील नागरिकांनी रोगप्रतिकार करणाऱ्या विविध उपाय योजना करून तसेच मास्क व इतर सुरक्षेच्या साधनांचा वापर करून सुरक्षीत राहण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन कुरकुंभचे सरपंच राहुल भोसले यांच्या कडून करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा