पुणे, दि. २३ जुलै २०२०: महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात आज लोकांना मास्क व महिलांना कापडी पिशवीचे वाटप करण्यात आले.
माय अर्थ फाउंडेशन, कृष्णाई प्रतिष्ठाण पुणे, आईसाहेब फाउंडेशन पुणे व दत्तवाडी पोलीस स्टेशन कोरोना वॉरिअर्स टीम यांनी मिळून ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. १०० मास्क व १० कापडी पिशव्या महाराणा प्रताप बाग परिसर, शुक्रवार पेठ या परिसरात वाटण्यात आले.
बेरोजगारीमुळे रस्त्यावर आलेल्या,तसेच गरीब, भिकारी लोकांना मास्क वाटप व महिलांना कापडी पिशवी यावेळी वाटप करण्यात आल्या. माय अर्थ फाउंडेशनचे अनंत घरत, राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाग अध्यक्ष श्रीकांत मेमाणे, पतित पावन संघटना, कसबा उपाध्यक्ष विजय जोरी यांच्या समवेत संघटनेचे कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
‘युवापिढीचे मार्गदर्शक असणारे अजित पवार यांच्या जन्मदिनीचे औचित्य साधून आज आम्ही हा उपक्रम राबविला. पुणे शहरातील आज बऱ्याच लोकांची मास्कही विकत घेण्याइतकी परिस्थिती नाही, अशा लोकांना एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम राबवला’ ,असे पतित पावन संघटनेचे कसबा उपाध्यक्ष विजय जोरी यांनी न्यूज अनकट प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे