कळंब, दि.१६ मे २०२० : कळंब तालुक्यातील पाथर्डी गावामध्ये मुंबईतून एक दाम्पत्य परतले. त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला हे समजताच प्रशासनाने पाथर्डी गाव सील केले तसेच गावाच्या सीमा देखील सील केल्या.
या दाम्पत्यांना कोरोनाची बाधा मुंबईत झाली असावी असा प्राथमिक अंदाज जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या बरोबर झालेल्या चर्चेतून व्यक्त करण्यात आला आहे.
गावामध्ये कोरोना रूग्ण आढळल्यामुळे गावात खळबळ उडाली आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आ.राणा जगजितसिंह पाटील यांनी गावातील प्रत्येक कुटुंबाला मास्क व सॅनिटायझर उपलब्ध करून दिले.
सदरील मास्क व सॅनिटायझर शुक्रवार दि. १५ मे रोजी पाथर्डी ग्रामपंचायतीकडे सुपूर्त करण्यात आले.
यावेळी अजित पिंगळे, चौधरी, पोलीस पाटील चिंचकर, उपसरपंच अर्जुन जाधव, कोरोना सहाय्यता कक्षाचे राजेंद्र पवार, प्रशांत लोमटे आदी उपस्थित होते.
न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड











































