गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा नाभिक समाजाला नमो सुरक्षा किटचे वाटप

नाभिक समाजाला नमो सुरक्षा किटचे वाटप

कर्जत, ३ जून २०२०: कर्जत तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाभिक समाजाने काळजी घेत व्यावसाय चालू करत असताना. वैभव शहा यांनी नमो सुरक्षा किटचे वाटप केले.

सविस्तर वृत्त असे की, कोरोना मुळे नाभिक समाजाला फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ देखील आलेली पाहण्यास मिळत होते. व्यावसाय चालू झाल्या नंतर सलून व्यावसायिकांची प्रथम सुरक्षा हवी त्यामुळे ग्राहक देखील सुरक्षित राहील. म्हणून कर्जत शहरातील नाभिक समाजातील नागरिकांना भाजप शहर अध्यक्ष वैभव शहा आणि नगरसेविका राखी शहा यांच्या वतीने नमो सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. कर्जत येथील श्री संत सेना महाराज मंदिरासमोर सामाजिक अंतर ठेवून मान्यवरांच्या उपस्थितीत या किटचे वाटप करण्यात आले.

या वेळी कर्जत नगर पंचायतीचे नगर अध्यक्ष नामदेव राऊत, माजी तालुका अध्यक्ष अशोक खेडकर, प्रसाद जोखरीकर, स्वप्निल देसाई, उमेश जेवरे, बजरंग कदम, प्रविण गाडेकर, अॅड. दिपक भंडारी, अॅड. अशोक कोठारी, आदी मान्यवर उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

error: Content is protected !!
Exit mobile version