नवी दिल्ली, ४ नोव्हेंबर २०२० : अंदाजे १७४ कोटी ६ लाखांची ही योजना २०१९-२० पासून ३ वर्षांसाठी निश्चित केली आहे. महाराष्ट्रासह १५ राज्यांमध्ये ही योजना राबवली आहे. अन्नाचे पोषणमूल्य वाढवण्यासाठी अन्न आणि पुरवठा विभाग पोषण मूल्य वाढवण्याची प्रक्रिया केलेल्या तांदूळाचे वाटप सार्वजनिक वाटपाच्या प्रक्रियेद्वारे करत आहे.
१५ राज्यांनी आपापल्या राज्यातील प्रत्येकी एक जिल्हा या योजनेसाठी निश्चित केला आहे. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात ही योजना राबवली जात आहे. आंध्रप्रदेश, गुजरात, तामीळनाडू, महाराष्ट्र आणि छत्तीसगढ या राज्यांनी ठरवलेल्या जिल्ह्यांमध्ये पोषणमुल्य वाढवण्याची प्रक्रिया केलेल्या तांदुळाच्या वाटपाची ही योजना सुरू केली आहे.
नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच या योजनेचे इतर भागधारक यांच्यामध्ये आज झालेल्या बैठकीत योजनेचे पुढील टप्पे आणि सुधारणांबाबत चर्चा झाली.
न्यूज अनकट प्रतिनिधी