गोल पोस्ट महाराष्ट्र कुर्डुवाडीत जोशाबा संस्थेच्यावतीने पुरस्कारांचे वितरण..

कुर्डुवाडीत जोशाबा संस्थेच्यावतीने पुरस्कारांचे वितरण..

माढा ६ नोव्हेंबर २०२० :बहुजन समाज परिषदेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त जोशाबा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने डॉक्टर समाजसेवक शाहीर पत्रकारासह विविध क्षेत्रातील मान्यवरांना पंचायत समितीच्या कै.विठ्ठलराव शिंदे सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमात सन्मानपत्र शाल पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले

सर्वप्रथम महापुरूषांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यंदा पुरस्काराचे पहिले वर्ष आहे अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष दिलीप देवकुळे यांच्या अध्यक्षतेखाली व विद्युत अभियंता युवराज मोरे शहाजान शेख यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला

या वितरणामध्ये डॉ.संतोष अडगळे डॉ.विजयकुमार लोंढे कलाकार निर्माते धनंजय खंडाळे शाहीर नंदकुमार पाटोळे गीतकार मनोज भडकवाड शाहीर वामन पाटोळे जेष्ठ कलाकार विठ्ठल साळुंखे सामाजिक क्षेत्रातील ज्ञानेश्वर माऊली कांबळे पत्रकारिता क्षेत्रात अशोक खारे उल्हास पाटील अंकुश आतकर भैरवनाथ कडाळे जगनाथ साठे बाबाफरीद पठाण अशी पुरस्कार प्राप्त मान्यवरांची नावे आहेत

यावेळी संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब देवकुळे आबासाहेब खंडाळे सुनील देवकर राणेश्वर हानवते अंकुश गोरवे यांच्यासह बहुजन समाज परिषदेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल ठोंबरे तर धनराज खंडाळे यांनी आभार मानले.

न्यूज अनकट प्रतिनिधी-प्रदीप पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version