माळेगांव येथे सॅनिटायझर व मास्कचे वाटप

सोलापूर, दि. १४ जून २०२०: माढा तालुक्यातील माळेगाव येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवकिर्ती युवा मंचाच्या माध्यमातून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या गोळ्या सॅनिटायझर व मास्कचे वाटप १२ जून २०२० रोजी केशव गायकवाड यांनी आपल्या स्वखर्चाने वाटप केले .

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक जण आपल्यापरीने मदत करताना दिसत असून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माळेगाव येथील युवक केशव गायकवाड यांनी कोरोना विषाणूला रोखण्यासाठी आवश्यक असणार्‍या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या १५० कुटुंबांना मोफत वाटप करण्यात आल्या व कोरोना संदर्भात जनजागृती व सर्व्हेचे काम करणारे ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा स्वयंसेविका यांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याच्या गोळ्या,सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले.

यावेळी केशव गायकवाड,ग्रा.पं.सदस्य नितिन गायकवाड ग्रामसेवक आर.बी.पखाले, शंकर गायकवाड, पोपट पवार, बापु गायकवाड, समाधान हुंबे, अंगणवाडी सेविका सुशीला गायकवाड, द्वारका कोळी, अर्चना गायकवाड, सविता लोंढे,आशा स्वयंसेविका राणी वाघमोडे व संगणक ऑपरेटर अमोल चोपडे उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा