गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या वतीने सभासदांना साखर वाटप

विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या वतीने सभासदांना साखर वाटप

माढा दि.२ नोव्हेंबर माढा तालुक्यातील उजनी येथे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दिवाळी सणासाठी कारखान्याच्या सभासदांना प्रत्येकी ५० किलो साखर घरपोच वाटप करण्यात आली. उजनी तालुका माढा येथे सोमवारी सकाळी सभासदांचा ऊस गळीत हंगाम २०१९-२० मध्ये गळीतास गेलेला आहे. त्या सभासदांना सालाबाद प्रमाणे याही वर्षी दिवाळी सणासाठी ही साखर वाटप करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माढा विधानसभा अध्यक्ष रमेश पाटील, उजनीचे सरपंच संतोष मेटे,उपसरपंच सतीश पाटील,बाळासाहेब पाटील,सुभाष वायकर, संतोष पाटील,नवनाथ मेटे,कल्याण गायकवाड, बालाजी कवडे,महादेव शेळके,लक्ष्मण शेळके,अमित झेंडे,जितेंद्र जाधव आदी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी-प्रदीप पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version