गोल पोस्ट महाराष्ट्र अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांना स्वेटरचे वाटप

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांना स्वेटरचे वाटप

बारामती, ३० जुलै २०२० : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज (दि ३० ) बारामती नगर परिषदेच्या महिला सफाई कर्मचाऱ्यांना येणाऱ्या हिवाळ्याच्या अनुषंगाने मोफत स्वेटरचे वाटप करण्यात आले. बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे व आरोग्य समितीचे सभापती कुंदन लालबिगे यांच्या हस्ते स्वेटरचे वाटप करण्यात आले.

बारामती नगर पालिकेच्या उपनगराध्यक्षा तरन्नुम सय्यद व मुस्लिम बँकेचे संचालक अल्ताफ सय्यद यांनी अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन पालिकेच्या सफाई कर्मचारी महिलांना पहाटेच्या वेळी रस्त्यावरील झाडलोट करावी लागते याचा विचार करून स्वेटर वाटपाचा कार्यक्रम झाला.

यावेळी नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे यांनी आपल्या मनोगतामध्ये ” सर्वच आरोग्य विभागाची टीम हे अतिशय मनापासून व चांगल्या पद्धतीने काम करीत आहे त्यांनी देखील आपल्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घेण्याचे गरज आहे.” असे नमूद केले अजित दादांना प्रिय असणाऱ्या वृक्षरोपण संदर्भात बारामती नगर परिषद प्रामुख्याने लक्ष देऊन काम करीत असल्याचा त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्ताफ सय्यद यांनी केले तर आभार सलीम तांबोळी यांनी मानले .या प्रसंगी आरोग्य निरीक्षक अजय लालबिगे व त्यांचे सहकारी उपस्थित होते आरोग्य विभागातील सर्व महिला कर्मचारी उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल यादव

error: Content is protected !!
Exit mobile version