पिंपरी ग्रामपंचायतीच्या वतीने पात्र लाभार्थीनां विविध साहित्य वाटप

पुरंदर, ८ ऑक्टोबर २०२०: पिंपरी ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यमान सरपंच मिना शेंडकर हस्ते अनुसूचित जातीसाठी व अपंग नीधीतून विविध साहित्य वाटप करून पात्र लाभार्थीनां धनादेश सुपूर्द करण्यात आले. कोरोनाचे नियम पाळुन येथील भैरवनाथ मंदिरात हा कार्यक्रम संपन्न झाला.

अनुसूचित जातीसाठी १५ टक्के निधीमधुन पहिल्या टप्प्यामध्ये ३५ पात्र लाभार्थींना ईन्व्हटर व ५५ टक्के निधीमधुन ९ पात्र दिव्यांग व्यक्तीनी लाईटवरील इंडक्शन शेगडीचे वाटप करण्यात आले. ज्या लाभार्थींनी वस्तू खरेदी करून ग्रामपंचायतीकडे बील सादर केले त्या सर्वांना धनादेश वाटप देखील करण्यात आले. तसेच जे पात्र लाभार्थी वंचित राहिले असतील त्यांना तात्काळ ग्रामपंचायतीकडे मागणी अर्ज देवुन वस्तू खरेदी करून बील सादर करावे त्यांना ही या योजनेचा लाभ दिला जाईल असे आवाहन सरपंच मीना शेंडकर यांनी केले.

यावेळी सरपंच मिना शेंडकर यांनी कोरोनासारख्या बिकट परिस्थितीमध्ये कशी काळजी घ्यावी या बद्दल मार्गदर्शन करून आज पर्यंत पिंपरी गांव कोरोना मुक्त ठेवण्यामध्ये महत्त्वाची भुमिका बजावणाऱ्या आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी कर्मचारी, पोलिस पाटील यांचे कौतुक केले व गावामध्ये सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा सांगितला.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुषमा थेऊरकर कृषिभुषण महादेव शेंडकर, तंटामुक्ती अध्यक्ष संपतदादा शेंडकर, हरिश्चंद्र थेऊरकर, रोहिदास हंबीर, शिवाजीआण्णा शेंडकर, दिलीप हंबीर, पांडुरंग गायकवाड, दत्तात्रय हंबीर यांच्यासह ग्रामस्थं उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा