सैन्यदलाकडून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचा सत्कार

पुणे, दि.३ मे २०२०: कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सतत कार्यरत असलेले पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचा भारतीय सैन्य दलकडून विशेष गौरव करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सोशल डिस्टंसिंग ठेवून भारतीय सैन्य दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, कर्नल शर्मा, आर. एस. पाटीयाल आदींसह शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

भारतीय सैन्य दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उप्रकमाबददल आभार व्यक्त करून जिल्हाधिकारी राम म्हणाले, पुणे जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला तेव्हापासून भारतीय सैन्य दल प्रशासनासोबत समन्वय ठेवून आहे. जिल्ह्यात पूरस्थिती किंवा संकट आले. त्यावेळी भारतीय सैन्य दल कायम प्रशासनासोबतच असते.

आजच्या कोरोना संसर्गाच्या स्थितीत प्रशासनाला पाठबळ देण्याचे काम भारतीय सैन्य दलाने केले. कितीही कठीण परिस्थिती आली तरी त्यामध्ये हिंमत देण्याची भारतीय सैन्य दलाची परंपरा असल्याचे सांगत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या प्रत्येकाचा हा सन्मान असल्याचेही जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा