जालना १८ ऑगस्ट २०२४ : महिला व बाल विकास विभागाकडून, समस्या व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या हेतूने जिल्हा तसेच तालुकास्तरावर महिलांसाठी विशेष लोकशाही दिन पाळण्यात येतो.
तालुकास्तरावर प्रत्येक तहसिल कार्यालयात महिन्याच्या चौथ्या सोमवारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयात दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार उद्या दि.१९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या महिला लोकशाही दिनात तक्रार दाखल करु इच्छिणाऱ्या महिलांनी आपली तक्रार दोन प्रतीमध्ये महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय जालना येथे दाखल करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जालना यांनी केले.
न्युज अनकट प्रतिनिधी : विजय साळी