गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा दिवंगत मनोहर पर्रीकरांची जीवनगाथा येणार पडद्यावर

दिवंगत मनोहर पर्रीकरांची जीवनगाथा येणार पडद्यावर

मुंबई : गोव्याचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी संरक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या जीवनावर चित्रपट बनविण्यात येणार आहे.
बॉलीवूड प्रोडक्शनची निर्मिती असलेला हा चित्रपट मनोहर पर्रीकर यांच्या वाढदिवशी. म्हणजेच १३ डिसेंबर २०२० ला रिलीज होणार असल्याचे समजते. या चित्रपटासाठी निर्माते स्वप्नील शेतकर यांनी मनोहर पर्रीकर याचा मुलगा उत्पल यांच्याबरोबर चर्चा करून चित्रपटाचे हक्क मिळविले आहेत असे समजते.
आजकाल राजकीय नेत्याच्या आयुष्यावर अनेक चित्रपट बनविले जात आहेत. बॉलीवूड मध्ये अश्या चित्रपटांची जणू लाट आली आहे.
प्रथम डॉ. मनमोहनसिंग, पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी, याच्यावर चित्रपट आले आहेत आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावरचा चित्रपट येऊ घातला आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version