‘दिव्यांग आपल्या दारी’ कार्यक्रमात दिव्यांग चक्कर येऊन पडले

ठाणे, १ सप्टेंबर २०२३ : ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र अपेक्षेपेक्षा जास्त दिव्यांगानी या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. या गर्दीमुळे तीन ते चार दिव्यांगाना चक्कर आल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ठाण्यात ‘दिव्यांग आपल्या दारी’ कार्यक्रमात दिव्यांग चक्कर येऊन पडले. हा प्रकार घडल्यानंतर आता कार्यक्रमाच्या नियोजनावरुन जिल्हापरिषद आणि ठाणे महापालिकेमध्ये एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचे प्रकार सुरू झालेत. या कार्यक्रमात दिव्यांगाना स्टोल मिळणार असल्याचे दिव्यांगाना सांगण्यात आल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

या गर्दीमुळे तीन ते चार दिव्यांगाना चक्कर आल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या कार्यक्रमासाठी योग्य पद्धतीने नियोजन करण्यात आले नव्हते असा आरोप दिव्यांग बांधवांनी केला आहे. या कार्यक्रमाला बच्चू कडू हजेरी लावणार होते. पण ते येण्यापूर्वीच हा सर्व प्रकार घडला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा