दिवाळी निमित्त दीपावली महोत्सवाचे आयोजन

पुणे,१२ नोव्हेंबर २०२० : दिवाळीनिमित्त धायरी गावात डीएसके विश्व येथे दीपावली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. काल दिनांक ११ नोव्हेंबर रोजी या महोत्सवाचे उद्घाटन झाले. या दीपावली महोत्सवाचे उद्घाटन खडकवासला मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भीमराव अण्णा तापकीर यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्षम नगरसेविका अश्विनी किशोर पोकळे व किशोर पोकळे यांचा प्रयत्नातून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

बचत गटातील महिलांना त्यांनी बनवलेल्या हँडमेड वस्तू विकण्यासाठी बराच वेळा बाजारपेठ उपलब्ध नसते. आणि सगळ्या बचत गटांच्या आग्रहास्तव धायरीगाव डीएसके विश्व येथे मोफत स्टॉल लावून त्यांच्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करण्याचे कार्य नगरसेविका अश्विनी पोकळे यांनी केले आहे.

या महोत्सवामध्ये १०० बचत गटांनी सहभाग घेतलेला आहे त्यामध्ये दिवाळीचा फराळ , सुशोभीकरणाच्या वस्तू, कपड्यांचे स्टॉल , त्याचप्रमाणे खाण्याचे पदार्थ असे अनेक विविध स्टॉल बचत गटांनी इथे लावलेले आहेत.
हा दिवाळी महोत्सव ११ व १२ नोव्हेंबर असा दोन दिवस असणार आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा