खरा आनंद, सुखं काय असते याचा अनुभव आज महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी अनुभवला.
निम्मित होते, सावली या संस्थेतील दिव्यांग मुलांसोबत साजरी झालेली माणुसकीची दिवाळी!!!
सावली संस्थेतील दिव्यांग मुलांनी दिवाळीनिमित्त विविध कला सादर करुन उपस्थित प्रेक्षकांचे मनोरंजन केले, धमाल मस्ती, नाच, गाणी यांनी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता आणी प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी…. एक वेगळा अनुभव, आयुष्याचा सच्चेपणा, गर्वाच्या शिखरावर तरंगणाऱ्या या सामान्य माणसाच्या अहंकाराला काही क्षणात जमिनीवर आणले.
लोकांच्या डोळ्यातील भाव आजच्या उपक्रमाचे यश सांगत होते.
नियोजनबद्ध साकारलेल्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महासंघाचे तसेच इतर ब्राह्मण संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
महासंघातर्फे सर्व उपस्थितांना व मुलांना दिवाळी फराळ वाटण्यात आला.
महासंघाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ केतकी कुलकर्णी, सौ शिल्पा महाजनी, सौ शैला सोमण, सौ सीमा रानडे,सौ चित्रा जोशी,राष्ट्रीय पदाधिकारी अमोघ टेंबेकर,कोषाध्यक्ष कमलेश जोशी, विवेक खीरवडकर, रवींद्र रानडे, डॉ अरुण जोशी, विकास अभ्यंकर, दीपक महाजनी, मनीष जोशी, प्रदीप रत्नपारखे, दयाकर दाबके उपस्थित होते.
मान्यवर पाहुण्यांमध्ये मकरंद जी माणकिकर, पप्पा जी पुराणिक, दत्तात्रय जी देशपांडे आवर्जून उपस्थित राहिले, सावली तर्फे सौ विनिताताई कामत , सौ अलका पारखी, सौ मयुरी कुलकर्णी व सर्व सावली परिवाराचे मोलाचे सहकार्य लाभले.
सुप्रियाताई बडवे, वसंत ठकार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले, कॅनडाहून किरण चिखले, रघुनाथ चितळे, रवींद्र रानडे यांचे प्रायोजकत्व लाभले. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा कार्याध्यक्ष मंदार रेडे यांनी केले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस