उस तोड कांमगाराची दिवाळी – सुंदर कुसाळकर,

इंदापूर दि.२६, नोव्हेंबर २०२० : भादलवाडी येथे उसतोड कामगार यांच्यामध्ये सेवराई सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून कु.नेहाजी नामदेव भोसले, हिचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला.

या वेळी शुभेच्छा देताना अखिल भारतीय सेना इंदापूर तालुका अध्यक्ष सुंदर कुसाळकर बोलत होते , आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले हे दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवतात.ते कष्टकरी गरीब लोकांपर्यंत पोहचून त्यांचे दुःख कमी करण्यासाठी प्रयत्न करतात. आज त्यांच्या या उपक्रमामुळे हजारो गरीब कुटुंबांना न्याय मिळाला आहे,जर प्रत्येकाने नामदेव भोसले यांच्यासारखे वाढदिवसाचे उपक्रम राबवले तर समाजहिताचा संदेश लोकांपर्यंत पोहचेल .

या वेळी नेहाजी नामदेव भोसले,यांना पोलीस उपनिरीक्षक विरेष प्रभु , पुणे जिल्हाचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा .अभिनव देशमुख. व नाशिकचे पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, पोलीस उपमहानिरीक्षक संदिप पाटील, बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया,पालकमंत्री अजितदादा पवार यांचे पि ए.तहसीलदार हनुमंत पाटील, आदिवासी विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे ,पोलीस उपअधीक्षक बारामती,नारायण शिरगावकर, पोलीस .नि.जिवन माणे व पो.नि.दिलीप पवार, यांनी कु नेहा हिला विढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

या वेळी आदिवासी समाजसेवक व साहित्यिक, नामदेव भोसले व सुंदर कुसाळकर.पिंटू शिंदे.संतोष भोसले. शर्मा पवार. स्वप्रित भोसले,सचिन राऊत, गौरी भोसले, परेवा काळे, राणी भोसले,व इतर उसतोड मजुर मोठ्या संखेने उपस्थित होते.

प्रतिनिधी निखिल कणसे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा