परभणी, २१ ऑक्टोबर २०२०:अतिवृष्टी मुळे सर्वत्र हानी झालेली आहे. नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सर्वजण करत आहेत. अशा परिस्थितीत, आज माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत पंकजा मुंडे यांनी परभणी जिल्ह्यातील गावांत झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
मागील दिवसांत झालेल्या अतिवृष्टी मुळे पिकांचे सर्रास नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. हाताशी आलेल्या खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अवेळी झालेल्या पावसामुळे शेतकरी हा आता संकटात पडलेला आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवलेल्या संकटामुळे शेतकरी बांधव दसऱ्याचा सण साजरा करू शकणार नाहीत. पण, राज्य सरकारने कोणतेही निकष न लावता शेतकऱ्यांची सरसकट मदत करावी. जेणेकरून शेतकरी बांधवाची दिवाळी तरी गोड होईल, असे मत पंकजा मुंडे यांनी मांडले.
न्यूजअनकट प्रतिनिधी- प्रगती कराड