गोल पोस्ट महाराष्ट्र छत्रपती संभाजी नगरच्या कन्नड शहरात एम के पी ग्रुप ऑफ कंपनी आणि...

छत्रपती संभाजी नगरच्या कन्नड शहरात एम के पी ग्रुप ऑफ कंपनी आणि केशवपुष्प उद्योग समूहाचे दिपावली स्नेहमिलन

छत्रपती संभाजी नगर १९ नोव्हेंबर २०२३ : छत्रपती संभाजी नगरच्या कन्नड शहरातील राजुरेश्वर मंगल कार्यालय येथे, उद्योजक मनोज पवार यांच्या एम के पी ग्रुप ऑफ कंपनी आणि केशवपुष्प उद्योग समूहाकडुन शहरातील महिला भगिनी, युवक, युवती यांच्यासाठी दिवाळी स्नेहमिलन आयोजन करण्यात आले होते. यात अनेक राजकीय, वैद्यकिय, शैक्षणिक,शेतकरी, वकील संघ यांनी पवार कुटुंब यांच्या विनंतीला मान देत हजेरी लावून शुभेच्छा दिल्या.

साला सालाबादप्रमाणे याही वर्षी एम के पी.ग्रुप ऑफ कंपनीने या दिपावली स्नेहमिलनाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी तालुक्यांतील कलावंतांनी आर्केस्ट्रा, हिंदु संस्कृतीचे भजन, गायन सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधले. कार्यक्रमात कन्नड शहरातील जनतेस स्नेहभोजनाचीही सोय करण्यात आली होती.

यावेळी तालुक्यातील सर्व राजकीय मंडळी तसेच प्रशासकीय अधिकारी यांनी उपस्थिती दर्शवली. कन्नड वासियांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देत पवार परिवाराने सर्वांची स्नेह भेट घेतली..

न्युज अनकट प्रतिनिधी : रविंद्र खरात

error: Content is protected !!
Exit mobile version