मुख्यमंत्र्यांना ज्ञानेश्वर कटके यांनी व्हिडीओ कॉल द्वारे पुण्यातील कोरोनबाबतची दिली माहिती

वाघोली, दि. १९ जुलै २०२०: राज्यभरात जिल्हा पातळीवर होत असलेल्या कोरोना नियंत्रण यंत्रणेचा आढावा घेत असताना आज मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी पुणे जिल्हा येथील स्थितीचा आढावा घेत समाधान व्यक्त केले. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील सर्व जिल्ह्यातील शहर तसेच ग्रामपातळीवर कोरोना नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या स्थितीचा आढावा घेतला.

मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये आरोग्य विभागाशी संलग्न तसेच संबंधित राज्यातील सर्व मा. मंत्री महोदय सहभागी झाले होते. राज्यातील काही निवडक शिवसेना जिल्हा प्रमुखही यामध्ये सहभागी झाले होते. पुणे जिल्हा प्रमुख म्हणून ज्ञानेश्वर कटके यांनीही या कॉन्फरन्समध्ये सहभागी होत मुद्दे मांडले.

विशेषता वाघोली परिसराकरिता कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या उपाय योजनांची माहिती मांडली व कोरोना केअर सेंटर, स्वँब टेस्टिंग सेंटर, रॅपिड टेस्ट, कॉरंटाइन सेंटर, ट्रीटमेंट आदी सुविधांबाबत माहिती दिली. राज्याचा आरोग्य विभाग ते जिल्हा परिषद प्रशासनापर्यंतचा पाठपुरावा करीत अतिशय कमी वेळेत ही कामे पूर्ण झाल्याची मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे तसेच अन्य मंत्री महोदयानी याबाबतची दखल घेतली.

त्याचबरोबर पक्षाच्या वतीने माजी खासदार शिवाजी आढळराव, यांच्यामार्फत जिल्ह्यामध्ये नागरिकांना सॅनेटायझर, मास्क, अर्सेनिक ३० अल्बम प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी च्या गोळ्या अन्नधान्य वाटप करण्यात आले त्याबद्दल देखील मुख्यमंत्री महोदयांनी समाधान व्यक्त केले. बैठक तब्बल तीन तास सुरू होती त्यामध्ये कटके यांनी लक्ष्यवेधी मुद्दे मांडले. त्यात प्रामुख्याने मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की जिल्हा आरोग्य प्रशासनाला सूचना करण्यात याव्यात व जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमध्ये व्हेंटिलेटर तसेच अतिदक्षता विभागाची सुविधा उपलब्ध विभागाच्या सुविधा करून द्याव्यात, त्याचबरोबर लॉकडाऊन काळामध्ये राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असून शेतकरी आर्थिक दृष्ट्या अडचणीत सापडलेला आहे.

शेतकऱ्यांना विज बिल भरणे शक्य नसल्या कारणास्तव शेतकऱ्यांचे विज बिल माफ करण्यासंदर्भात देखील मुख्यमंत्र्याकडे विनंती केली. बैठकीतील सहभागाबद्दल शिवसेना जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यासह सर्व मंत्री महोदयांचे व अधीकारी यांचे आभार मानले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा