असा करा पावसाळ्यात मेकअप…

पुणे, १९ जुलै २०२२: सौंदर्य खुलवण्यासाठी मेकअप हा महत्त्वाचा भाग मानला जातो. पण त्यातही पावसाळ्यात मेकअप करणे आणि टिकवणे, हे अत्यंत गरजेचे असते. यासाठी काही महत्त्वपूर्ण टिप्स …

१. पावसाळ्यात मेकअप करण्यापेक्षा मेकअप टिकवणे, महत्त्वाचे असते. यासाठी वॉटरपूफ्र मेकअपचा वापर करा.

२. चेहऱ्यावर फाऊंडेशनचा बेस लावताना तो लिक्विड न घेता, मॅट घ्यावा. जेणेकरुन तो जास्त काळ टिकतो.

३. आयशॅडोचा थर किंचीत जाड असावा, तर आयलाईनर हे पेन्सिल युक्त वापरावे. जर लिक्वीड लायनर वापरल्यास ते ओघळून चेहरा खराब होण्याची जास्त शक्यता असते.

४. लिपस्टिकमध्ये शक्यतो मॅट लिपस्टिक वापरावी. तर लिपस्टिकमध्ये ग्लॉस हवा असल्यास वरुन केवळ व्हॅसलिन किंवा लिक्विड लिप कलर वापरावा. म्हणजे लिपस्टिक खुलून दिसेल.

५. संपूर्ण मेकअपवर पावडरचा थर द्यावा.

६. आजकाल मार्केटमध्ये वॉटरप्रूफ प्रॉडक्टस आली आहेत. शक्यतो त्यांचा वापर करावा.

७. कायम ब्रॅण्डेड आणि उच्च प्रतीची सौंदर्यप्रसाधने वापरावी. जेणेकरुन त्वचेला इजा होणार नाही.

८. जर संध्याकाळी कुठल्याही कार्यक्रमाला हजेरी लावण्याची असल्यास हेअरस्टाईलवर स्प्रे मारणं कायम उचित ठरेल. अन्यथा पावसाचे पाणी केसांवर पडून हेअरस्टाईल खराब होण्याची शक्यता असते.

९. पर्फ्युम हा कायम कार्यक्रमाच्या स्थळी जाऊनच मारावा. अन्यथा पावसाचे पाणी पडून कपडा ओलसर होतो आणि त्याचा वास आणि पर्फ्युमचा वास एकत्र होऊन वेगळाच वास निर्माण होण्याची शक्यता असते. जेणेकरुन तुमचे कार्यक्रमातले लक्ष उडून जाऊ शकते.

१०. बाहेर जाताना कायम आयशॅडो, लायनर आणि लिपस्टिक जवळ बाळगा. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तुम्हाला टचअप करता येईल.
या मह्त्वाच्या काळजी जर तुम्ही घेतल्या तर तुमचा मेकअप तुमच्यावर खुलून दिसेल हे नक्की.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा