नवी दिल्ली, १७ मे २०२३ : भीतीचे वातावरण निर्माण करु नका, असे फटकारत तुम्ही असे वागता तेव्हा एकादे सत्य कारणही संशयास्पद बनते, असे निरिक्षक सर्वोच्च न्यायालयाने सक्तवसुली संचालनालया विरोधातील याचिकेवरील सुनावणीवेळी नोंदवले. छत्तीसगडमधील २ हजार कोटींच्या मध घोटाळ्याशी संबंधित मनी लाँन्ड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना गोवण्याचा आरोप राज्य सरकारने केला होता.
या प्रकरणी दाखल याचिकेवर न्यायमूर्ती एसके कौल आणि ए अमानुल्ला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने ईडीला खडेबोल सुनावले आहे. छत्तीसगड सरकारने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अनेक अधिकाऱ्यांनी तक्रार केली आहे की, ईडी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना अटक करण्याची धमकी देत आहे. या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना गोवण्याचा प्रयत्न करत आहे.
उत्पादन शुल्क विभागाच्या ५२ अधिकाऱ्यांनी तपासादरम्यान ईडी अधिकाऱ्यांनी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप करत लेखी तक्रार केली आहे. ईडीने छत्तीसगडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करु नये, असे फटकारत तुम्ही असे वागता तेव्हा एकादे सत्य कारणही संशयास्पद बनते, असे निरीक्षणही खंडपीठाने नोंदवले. राज्याने दाखल केलेल्या याचिकेवर ईडीला उत्तर धावे, असे आदेशही खंडपीठाने दिले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर