डिसेंबरमध्ये करा टॅक्सशी संबंधित ही ३ महत्त्वाची कामं, नाहीतर नवीन वर्षात वाढतील अडचणी!

पुणे, २१ डिसेंबर २०२२: २०२२ चा शेवटचा महिना सुरू झालाय. या महिन्यानंतर, जग नवीन वर्षाच्या उत्सवात मग्न होईल, मात्र हा जल्लोष करत असताना कोणतीही चिंता नको असंल तर कराशी संबंधित काही कामं या महिन्यातच पूर्ण करणं आवश्यक आहे. जर टॅक्स विषयी लेट फी टाळायची असंल किंवा आधीच भरलेल्या आयटीआरमधील चूक सुधारायची असंल, तर या महिन्यात त्याची पुर्तता करा. यासोबतच GSTR-9c आणि ॲडव्हान्स टॅक्सचा तिसरा हप्ता जमा करण्याचं कामही डिसेंबर महिन्यात पूर्ण केलं जाऊ शकतं. मग करसंबंधित कामांतून मुक्त होऊन तुम्ही नवीन वर्षाच्या जल्लोषात मग्न होऊ शकता.

लेट फीसह ITR फाइल

जर तुम्ही आयकर अंतर्गत येत असाल आणि अजून २०२१-२२ साठी आयटीआर रिटर्न भरलं नसंल, तर तुम्ही हे काम ३१ डिसेंबरपर्यंत विलंब शुल्कासह पूर्ण करू शकता. जर तुमचं वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी असंल तर तुम्हाला एक हजार रुपये दंड भरावा लागंल. दुसरीकडं, जर तुमची कमाई पाच लाख रुपयांपेक्षा जास्त असंल तर तुम्हाला पाच हजार रुपये विलंब शुल्क भरावं लागंल. त्यामुळे डिसेंबर महिना संपण्यापूर्वी कराशी संबंधित हे काम मार्गी लावा.

ITR मध्ये सुधारणा

२०२१-२२ साठी आयकर रिटर्न भरताना तुमच्याकडून काही चूक झाली असंल, तर तुम्ही ती ३१ डिसेंबरपर्यंत दुरुस्त करू शकता. तुम्हाला ३१ डिसेंबरपर्यंत सुधारित विवरणपत्र भरावं लागेल. जर तुम्ही हे काम करू शकणार नसाल तर तुम्हाला चूक सुधारण्याची संधी मिळणार नाही. अशा स्थितीत तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीसही मिळू शकते.

GSTR-9

जीएसटीमध्ये नोंदणी केलेल्या करदात्यांना प्रत्येक आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर दरवर्षी GSTR-9 दाखल करावा लागतो. आवश्यक असल्यास रिव्हिजन रिटर्न भरावे लागतील. २०२१-२२ साठी त्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर आहे. या तारखेनंतर रिटर्न भरल्यास दररोज २०० रुपये दंड आकारला जाईल. तो टर्नओव्हरच्या कमाल ०.५ टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. ज्यांची वार्षिक उलाढाल पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे अशा करदात्यांना GSTR-9C आवश्यक आहे.

ॲडव्हान्स टॅक्स

जर तुम्हाला ॲडव्हान्स टॅक्स भरायचा असेल आणि तुम्ही १५ डिसेंबरच्या शेवटच्या तारखेपर्यंत भरू शकत नसाल, तर आता त्यासाठी वेगळा नियम आहे. अशा करदात्यांना ज्यांचा वार्षिक कर १० हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. १५ डिसेंबरपर्यंत ७५ टक्के अॅडव्हान्स टॅक्स जमा करू शकला नाही, तर एक टक्का व्याज आकारलं जाईल. ७५ टक्क्यांपेक्षा कमी अॅडव्हान्स टॅक्स भरल्यास एक टक्का व्याजही आकारलं जातं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा