पुणे, दि.३०एप्रिल २०२०: कोरोनाच्या महामारीमुळे सध्या अनेक दवाखाने बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना वैद्यकीय उपचार मिळावे म्हणून वानवडी येथे “डॉक्टर आपल्या दारी” हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमात वैद्यकीय उपचार व औषधे मोफत देण्यात येत आहेत. वानवडी परिसरातील दहा हजार नागरिकांपर्यंत सेवा पोहोचविणार असल्याचे रेल्वे समिती सदस्य दिनेश प्रसाद होले यांनी सांगितले. आतापर्यंत या उपक्रमांतर्गत १६०० नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.
वानवडी, भैरोबानाला, साळुंके विहार, एनआयबीएम, रामटेकडी, हडपसर, रेस कोर्स परिसरात उपक्रमासाठी ९८२३६१६१७० या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन होले यांच्याकडून करण्यात आले आहे.
या उपक्रमाचे डॉ रुपेश शिंदे, डॉ ज्ञानेश्वर दोडके उपचार करीत आहेत. स्पेक्ट्रम एजुकेशनचे ऍड अमिताभ मेहता, प्रशांत दुधगावकर संयोजन करीत आहेत.
उपक्रम कार्यरत करण्यासाठी वानवडीतील राजू कोंडेकर, विनायक जांभुळकर, प्रतीक जोशी, नीरज बागवे, रोहन होले, सतीश सुर्वे, सौरभ लावंड, स्वप्नील कापसे परिश्रम घेत आहेत.
हा उपक्रम वानवडी येथील स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान, दिनेश होले मित्र परिवार, स्पेक्ट्रम एज्युकेशन भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्स व परिसरातील गणेश मंडळे यांच्या सहकार्याने राबवले जात आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी – किरण लोहार