अपघात झालेल्या व्यक्तीवर उपचार करण्यास डॉक्टरचा नकार

उरुळी कांचन, दि. ०७ सप्टेंबर २०२०: अपघातात जखमी झालेल्या वृद्ध व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने उपचार करण्यास डॉक्टरांनी चक्क नकार दिला आहे. या घटनेने पूर्व हवेलीमधील परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

हवेली तालुक्यातील आळंदी म्हातोबाची या गावात पासिंग नसलेल्या ट्रँक्टरने दुचाकीवरून चाललेल्या वृद्ध व्यक्तीला उडवले होते. त्या व्यक्तीला जखमी अवस्थेत कुंजीरवाडी येथील दवाखान्यात नेले असताना कानातून रक्त येत होते. व पायाचे हाड बाहेर निघाले होते.

सदर व्यक्तीस थोडासा प्राथमिक उपचार करून कोरोनाच्या चाचणीसाठी कदमवाकवस्ती येथे पाठवले असता अँम्बुलन्समधून उतरवून घेण्याचे सौजन्य सुद्धा कर्मचाऱ्यांनी दाखवले नाही.

त्यांच्या सुनेने त्यांना परत कुंजीरवाडी येथील दवाखान्यात आणले. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट पाँझीटिव्ह आला असता डॉक्टरने आमच्या इथे उपचार होणार नाही, असे सांगितले. रिपोर्ट येण्याच्या अगोदरच कानाला टाके घालण्याचे ठरले होते. रिपोर्ट आल्यावर मात्र नकार डॉ ने दिला. नंतर कोवीड सेंटरला आल्यानंतर बेड शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. ते आता घरीच असून आजपर्यंत कुणीही कानावर व पायावर उपचार केले नाही. सुनेने खुप प्रयत्न केले, पण कुणीही त्यांना दवाखान्यात घेतले नाही. या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा