इस्लामाबाद, १६ नोव्हेंबर २०२०: भारताची सर्वात महागडी आणि लोकप्रिय लीग म्हणजे आयपीएल लीग . संपूर्ण भारतात या लीगची प्रसिद्धी वर्षानुवर्षे वाढतच चालली आहे. तर या इंडियन प्रिमीयर लीग मधे पाकिस्तानी खेळाडूंना खेळण्यास परवानगी नाही.
पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएल मधे खेळण्यास परवानगी नसल्यामुळं त्यांनी स्वत:ची “पाकिस्तान सुपर लीग” ची सुरवात केली. तसे इंडियन प्रिमीयर लीग मधे सुपरहिट सामने आणि खेळाडूंच्या करामती पहायला मिळतात तिथेच पाकिस्तान सुपर लीग मधे वेगळे आणि विचित्र प्रकार ही समोर येतात.
पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा सुरू असून मुलतान आणि कराची विरूद्ध रंगलेल्या सामन्यात बाबर आझमच्या कराची संघानं अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. पण, या समान्यावेळी एक मजेशीर किस्सा घडला. कराचीचा संघ १३ षटकानंतर ३ बाद ९० या परिस्थितीत खेळत होता आणि १४ वी ओव्हर सुरू होण्याआधीच मैदानावर एका कुत्र्यानं एंट्री घेतली. त्यानं थेट खेळ पट्टीवर जाऊन आपलं ठाण मांडलं. मग काय कुत्रं जो पर्यंत तिथं होतं तो पर्यंत काही वेळेसाठी त्यांना खेळ थांबवावा लागला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव