झोंबिवली या चित्रपटाच्या नावावर डोंबिवलीकरांचा आक्षेप..

डोंबिवली, ३१ जुलै २०२० : डोंबिवली नावावरून डोंबिवली फास्ट हा चित्रपट येऊन गेला आणि तो चित्रपट सुपरहिट सुद्धा झाला होता. तेव्हा डोंबिवलीकरानी सुद्धा चित्रपटाला उचलून धरले होते. मात्र काल झोंबिवली या चित्रपटाचे पोस्टर सर्व ठिकाणी व्हायरल झाले आणि नावावरून वाद निर्माण व्हायला सुरवात झाली आहे. मनसे शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी चित्रपटाच्या नावाला विरोध केला आहे. त्यानी या विरोधात फेसबुक पोस्ट केली आहे .

माझ्या डोंबिवलीचे कोणी ही यावे आणि वाभाडे काढावे हे मी तरी खपवून घेणार नाही, माझ्या शहराचा अपमान हा माझा अपमान असं मी समजतो. आमच्या शहरात नागरी समस्या, सर्वच ठिकाणी आहेत, आम्ही आमच्यात बघुन घेवू, आमच्या डोंबिवलीच्या संस्कृतीचे जगाने अनुकरण केले, कुठलेही क्षेत्र असे नाही किंवा जगाच्या पाठीवर असा कुठलाही कोपरा नाही जिथे माझा डोंबिवलीकर भेटणार नाही, सुशिक्षित,सुसंस्कृतांची ही पंढरी आहे,डोंबिवली हे कलेचे, कलाकारांचे माहेर घर आहे अशा ह्या माझ्या शहराची बदनामी करू नका असे म्हणत कठोर शब्दांत त्यानी .या झोंबिवली चित्रपटाचा विरोध केला आहे.

झोंबिवली या चित्रपटाचे चित्रीकरण अद्याप पुर्ण झालेल नाही. मात्र लॉकडाउन नंतर हे चित्रीकरण सुरू होईल असे सांगण्यात आले आहे . या चित्रपटात अमेय वाघ , ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी हे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत .मात्र या चित्रपटाच्या नावावरूनच आता डोंबिवलीकरांनी नाराजगी दाखवली आहे. प्रसिद्धीकरिता काहीही करू नका, प्रत्येक गावाचा शहराचा सन्मान राखला गेलाच पाहिजे. नाव आदराने घ्या. आमचा अभिमान डोंबिवलीच…! असे डोंबिवलीकरांकडून फेसबूक पोस्ट केल्या जात आहेत .

न्यूज अनकट प्रतिनिधी : राजश्री वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा