मुंबई, ६ डिसेंबर २०२०: कोरोना महामारीमुळं राज्यात अनेक ठिकाणी रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. ज्या मुळं राज्य सरकार नागरिकांना रक्तदान करण्याचं आवाहन करत आहेत. रक्तदाना बाबत नागरिकांचा आजून ही थोडा संभ्रम असून मनात भिती आहे. त्यामुळं मुंबईतील एका नेत्यानी अनोखी शक्कल लढवली आहे.
रक्तदान शिबिरांचं आयोजन करणाऱ्या मंडळींनी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी रक्तदान करावं यासाठी मांसाहारी रक्तदात्याला कोंबडीचं एक किलो मांस, तर शाकाहारी रक्तदात्याला पनीर देण्यात येणार असल्याची जाहीरात दिसली. ज्यामुळं सर्वत्र चर्चेचा विषय झाला असून एक आगळा वेगळा उपक्रम या शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
रक्तदान शिबिरांचं आयोजन करणाऱ्या मंडळींनी नागरिकांच्या मनातील भीती ओळखून रक्तदान करणाऱ्यास भेटवस्तू देण्याचे आमीष दाखविण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना नगरसेवक समाधान सरवणकर यांनी माहीम–वरळी विधानसभा क्षेत्रात १३ डिसेंबर रोजी महा रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. हे रक्तदान शिबीर न्यू प्रभादेवी रोडवरील राजाभाऊ साळवी मैदानात पार पडणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव