मुंबई, ६ जानेवारी २०२३ : मनोज वाजपेयी यांचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचे त्यांनी आज इन्स्टावर स्टोरी ठेवून कळविले. छोट्या-छोट्या भूमिका साकारून बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत नम्र अभिनेत्यांपैकी मनोज वाजपेयी एक आहेत. त्यांच्या अभिनयाच्या जोरावर आतापर्यंत त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले आहे. इंस्टाग्रामवर ३.६ दशलक्षमध्ये त्यांचे फॉलोअर्स आहेत. तर ट्विटरवरही त्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. म्हणूनच त्यांनी स्टोरी ठेवून चाहत्यांना सावध केले आहे.
आज सकाळीच मनोज वाजपेयी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहितात, की ‘माझे ट्विटर अकाउंट हॅक झाले आहे. जोपर्यंत समस्येचे निवारण होत नाही तोपर्यंत कृपया आज माझ्या प्रोफाईलवर येणाऱ्या कोणत्याही गोष्टीवर क्लिक करू नका किंवा संवाद साधू नका. सध्या त्या संबंधित काम सुरू आहे. आपल्याला समस्या सोडवली की सूचित करण्यात येईल.’
मनोज वाजपेयींच्या ट्विटर अकाउंटवर पाहिले तर गुरुवारनंतर एकही पोस्ट केली गेलेली नाही. त्यामुळे अद्याप ट्विटर अकाउंटवर कोणतीही चुकीची गोष्ट घडलेली नाही. त्याचप्रमाणे इंस्टाग्राम अकाउंटवरून चाहत्यांना सतर्क केल्याने कोणत्याही चाहत्याचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली गेली आहे. तर मनोज वाजपेयींच्या ट्विटर अकाउंटवरील पोस्ट आणि रिट्विट सतत तपासले जात आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे