“तुम्ही दारू पिऊन गाडी चालवू नका,आम्ही घरपोच देऊ,” या कंपनीने केली घोषणा….

9

नवी दिल्ली, ४ फेब्रुवरी २०२१: तुम्ही मद्य प्राशन करून अनेक वेळा गाडी चालवली आसेल. पण आता एक कंपनी तुमच्या साठी एक आनंदाची सर्व्हिस घेऊन आली आहे. ज्यामधे तुम्हाला घरपोच दारू पोहचवण्याचे काम करणार आहे. त्यामुळे आता तुम्ही निश्चित पणे घरीच अल्हकोहल मागवू शकता. भारतात अशी सुविधा नव्हती मात्र आता आपल्या देशात सुरू होणार आहे.

“तुम्ही दारू पिऊन गाडी चालवू नका,आम्ही घरपोच देऊ,” अशी घोषणा उबर कंपनीने केली आहे. फुड डिलिव्हरी सर्व्हिस देणारी कंपनी उबर लवकरच मद्याची डिलिव्हरी सुरू करू शकते.उ बर कंपनी ११० कोटी डाॅलर मध्ये ऑनलाईन अल्कोहल डिलिव्हरी करणारा प्लेटफाॅर्म Drizly खरेदी करणार आहे.

ही सुविधा सध्या केवळ अमेरिकेतच मिळत आहे.तर भारतात कधी सुरू होणार, याबाबत कंपनीने कोणतीही माहीती दिली नाही. मात्र, भारतात या सुविधेबद्दल चर्चा आता जोर धरत आहे. मग ही सुविधा जर देशात आली तर मद्दप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव