वजन वाढू देऊ नका … काळजी घ्या…

पुणे, १८ ऑगस्ट २०२२: कोविडच्या लॉकडाऊन काळात सगळ्यांना आपल्या तब्येतीचं महत्त्व समजलं. त्यामुळे आता प्रत्येकजण स्वत:चे वजन वाढू नये, यासाठी काळजी घेताना दिसत आहे. हे वजन वाढू नये यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स.

१. सकाळचा ब्रेकफास्ट हा जास्त प्रोटिनयुक्त असावा.

२. दिवसातून कमीत कमी १६ ग्लास पाणी प्या. त्यामुळे तुमची पचनसंस्था कार्यरत होते.

३. रोज किमान ४५ मिनिटे व्यायाम करा.

४. आठवड्यातून एकदा तुमच्या वजनाचा अंदाज घ्या. त्यानुसार तुम्हाला तुमच्या व्यायामात, आहारात बदल करता येईल.

५. सकाळच्या वेळात पंधरा मिनिटे तरी कोवळ्या उन्हात बसा.

६. जेवणाच्या वेळा पाळा. योग्य वेळेत जेवण करा आणि पोषक आहार घ्या.

७. नियमित आठ तास झोप घ्या. झोप हा वजनासाठी अत्यंत आवश्यक घटक मानला जातो.

८. जेवणाचे श्येडूल ठरवून नीट त्यावर लक्ष ठेवा. भूकेपेक्षा जरा कमी जेवा.

९. रोज चालण्याचा व्यायाम करा. जेणेकरुन संपूर्ण शरीराचे वजन कमी होण्यास मदत होईल.

१०. संध्याकाळी सात ते आठ या कालावधीत जेवण केल्यास अन्न पचनास योग्य वेळ मिळतो. आणि जेवणाचे चरबीत रुपांतर होणार नाही. त्यामुळे वजन वाढणार नाही.
या सर्व गोष्टी काटेकोरपणे पाळल्यास तुमचं वजन नक्कीच वाढणार नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा