गोल पोस्ट इतर राजकारण नरेंद्र मोदी यांच्या नादाला लागू नका’; भाजप नेत्याचा विरोधकांना इशारा

नरेंद्र मोदी यांच्या नादाला लागू नका’; भाजप नेत्याचा विरोधकांना इशारा

मुंबई, ८ सप्टेंबर २०२२: भाजप प्रदेशाअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना थेट इशाराच दिला आहे. नरेंद्र मोदींचं कर्तृत्व आणि नेतृत्व खूप मोठ आहे. अशा नेत्याची बरोबरी तुम्ही करु शकत नाही. शरद पवारांनी नरेंद्र मोदींच्या नादाला लागू नये, असा इशारा माध्यमांशी बोलताना बावनकुळेंनी दिला.

नितीश कुमार आणि शरद पवारांच्या भेटीवर आपलं मत मांडताना बावनकुळे म्हणाले, “त्यांच्या कितीही भेटी होऊ द्यात. चौथी, पाचवी, सहावी कीतीही आघाड्या होऊ देत. त्यांना त्यांची आघाडी लखलाभ असो”

ज्या पक्षाचे दहा खासदार निवडून येत नाहीत. ज्या पक्षाचे साठच्यावर आमदार निवडून येत नाही. त्यांनी दिवसा स्वप्न बघू नये, असा टोलाही पवारांना बावनकुळेंनी लगावला.

नितीश कुमारांनी तिकडे दगाबाजी केली आणि इकडे उद्धव ठाकरेंनी केली. आम्ही दगाबाजांना त्यांची जागा दाखवून देऊ, असंही पुढं बावनकुळे म्हणालेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सुरज गायकवाड

error: Content is protected !!
Exit mobile version