सध्या लॉक डाऊन नको, कडक निर्बंध लादावेत, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा

मुंबई, २५ मार्च २०२१: राज्यात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भाव काही केल्या कमी होताना दिसत नाही. दिवसेंदिवस रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात काल राज्यात या वर्षातील सर्वात मोठा आकडा समोर आला. काल एकाच दिवसात ३१ हजारापेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह निघाले. पुणे मुंबई नाशिक यांसारख्या ठिकाणी परिस्थिती गंभीर होत चालली आहे. अशा परिस्थितीत लॉक डाऊन करावे की कडक निर्बंध लावावेत याबाबत चर्चा चालू आहेत. असाच सवाल काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी केला. यावर सरसकट लॉक डाऊन नको त्याऐवजी निर्बंध अधिक कठोर करण्यावर मंत्र्यांमध्ये सहमती झाली. तसेच राज्यातच रुग्ण जास्त कसे, अशी शंकाही या वेळी उपस्थित करण्यात आली.

या बैठकीदरम्यान यापूर्वी लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊनचा अनुभव फारसा चांगला नाही. तसेच त्यातून आर्थिक गाडी रुळावरून घसरते. यामुळे लॉक डाऊनचा सध्या तरी विचार होऊ नये, असेच सर्वांचे मत झाले. राज्यात सध्या सरासरी २५ हजारांच्या आसपास दैनंदिन रुग्ण आढळत आहेत. हा कल असाच राहिल्यास लॉक डाऊन शिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट करण्यात आले. लॉक डाऊन ऐवजी सध्या लागू असलेले निर्बंध अधिक कठोर करण्यात यावे, अशी सूचना मंत्र्यांकडून करण्यात आली.

फक्त महाराष्ट्रातच रुग्ण संख्या जास्त का

आपल्या देशात किंवा अनेक राष्ट्रांमध्ये करोनाचे रुग्ण आढळत आहेत. पश्चिाम बंगाल, तमिळनाडू, केरळ आदी निवडणुका होणाऱ्या राज्यांमध्ये जाहीर सभांमध्ये मोठ्या प्रमाणावर गदी होते. पण रुग्णसंख्या महाराष्ट्रातच अधिक कशी, असा सवाल मंत्र्यांकडून करण्यात आला. केंद्राने आतापर्यंत महाराष्ट्रात आठ वेळा पथके पाठविली. केंद्र सरकारकडून दररोज नवी दिल्लीतील पत्रकार परिषदांमध्ये महाराष्ट्राचाच उल्लख केला जातो. हे सारे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कटकारस्थान तर नाही ना, अशी शंका काही मंत्र्यांनी व्यक्त केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा