मुंबई, ६ ऑक्टोंबर २०२०: गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेले सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण हे एम्स च्या डॉक्टर्स’नं कायमचं संपवत ती हत्या नसून आत्महत्याच असल्याचं स्पष्ट केलं आहे. अशातच आता भाजप नेत निलेश राणे यांनी याबाबत टिप्पणी करतांना शिवसेनेला,’ एवढ्या लवकर डीजे वाजवू नका’ असा सल्ला दिलाय.
याबाबतची भूमिका मांडताना निलेश राणे यांनी शिवसेनेवर चांगलाच निशाणा साधला आहे. निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून म्हटलं की,” सुशांत सिंग राजपूत प्रकरणात एम्स च्या अहवालानंतर शिवसेना उड्या मारायला लागली, त्यांना वाटतं की या प्रकरणाचा निकाल लागला. बॉडी नसल्यामुळं फक्त उरल्या सुरल्या गोष्टींवर अहवाल द्यावा लागला. यावर राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत म्हणालं, सी बी आय चा अहवाल येणं अजून बाकी आहे. एवढ्या लवकर डीजे वाजवू नका”.
याबाबत शिवसेनेचे मुखपत्र असलेले सामना वृत्त पत्रातून ही शिवसेनेनं सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूबाबत एम्स’नं दिलेल्या अहवालावरून विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला आहे.
आपल्या मुखपत्रात ते म्हणाले,” सत्य हे कधीच दडपता येत नाही. सुशांत सिंग प्रकरणी हे सत्य अखेर बाहेर आलंच आहे. याप्रकरणी ज्यांनी महाराष्ट्राची यथेच्छ बदनामी केली , त्याचं पुरतं वस्त्रहरणच झालं आहे.” ठाकरी भाषेत बोलायचं झाले तर सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणानंतर अनेक गुप्तेश्वरांना महाराष्ट्र द्वेषाचा गुप्तरोग झाला होता. पण, शंभर दिवस खाजवून ही शेवटी हाती काय लागलं?? सत्य आता एम्स’नं बाहेर आणलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे