साहित्य: दुधी भोपळ्याच्या साल काढुन फोडि-१ कप
दही- १ कप चणा डाळ-२-३ टेबलस्पुन (धुवुन भिजवुन) डाळिच पिठ- एक डाव भर
कढिपत्ता, कोथिबिर, फोडणीच साहित्य, तेल, मिठ, साखर
कृती: दुधी भोपळ्याच्या साल काढुन फोडि करुन घ्याव्या यात भिजवलेली चणा डाळ मिसळुन कुकरला २-३ शिट्ट्या करुन मउ शिजवुन घ्याव.
शिजलेल्या फोडी गार झाल्या की त्यात डावभर पिठ, दही जरा घुसळुन आणी पाणि घालुन शिजायला ठेवाव.
एकिकडे कढईत कढिपत्ता जिरे मोहरी , हिन्ग, हळद आणि तिखटाची चरचरित फोडणी करावी आणी वरच्या शिजलेल्या मिश्रणात ओतावी, तिखट आणी तेल हेमट्या हाताने घालु नये पण अगदी सणसणित करायची गरज नाही. सांबार घटट वाटल तर जरा पाणी घालुन पळिवाढ कराव, मिठ आणि साखर चविप्रमाणे घालाव.
कोथिबिर घालुन गरम भात किवा पोळिबरोबर खाव.