डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथे अभाविपचे आंदोलन

उस्मानाबाद, १० सप्टेंबर २०२०: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद धाराशिव जिल्हा यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथे आंदोलन करण्यात आले यावेळी मा. कुलगुरू यांना निवेदन देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या सांगून त्यांना या समस्या वारंवार विचारले असता आद्यापही याचे उत्तर दिले नसल्याने कुलगुरूंना याचा जाब विचारण्यात आला.

विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्यात यावे. चालु वर्षाच्या शैक्षणिक शुल्कात ३०%कपात करावी. धाराशिव मधील उपकेंद्र हे लवकरात लवकर स्वतंत्र विद्यापीठ करावे. मागील सत्रातील १५ मार्च पासून घेतलेली ग्रंथालय फी, व्यायामशाळा फी, अभ्यासिका फी, मेस फी, डेव्हलपमेंट फी, हॉस्टेल फी व इतर फी ही लवकरात लवकर परत करावी. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसर येथे लवकरात लवकर तक्रार निवारण केंद्र उभे करण्यात यावे.

आदी मागण्यांना घेउन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आज दिनांक १० सप्टेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे आंदोलन केले. यावेळी कुलगुरूनी अभाविपच्या शिष्टमंडळाला मागील शैक्षणिक वर्षाचे परीक्षा शुल्क परत करण्यासह चालू शैक्षणिक वर्ष शुल्कात तीस टक्के कपात करण्यासाठी विद्यापीठाने एक समिती गठित केली असून एक महिन्यात विद्यार्थ्यांना हे शुल्क परत करण्यात येइल असे आश्वासन दिले.

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा