इंदापूर, ६ डिसेंबर २०२०: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांनी देशासाठी रचनात्मक असे महान कार्य केले आहे, असे गौरवोद्गार माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथील जेतवन बुद्ध विहार याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करताना आज रविवारी (दि.६) काढले.
हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर नगरपरिषदेच्या समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर त्यांनी जेतवन बुद्ध विहार याठिकाणी डॉ.आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, नगरसेविका राजश्री मखरे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, मुकुंद शहा, शिवाजी मखरे, बाळासाहेब सरवदे, संदिपान कडवळे, अशोक मखरे, मंगेश पाटील, प्रा. कृष्णा ताटे, नगरसेवक कैलास कदम, शकील सय्यद, प्रा.जीवन सरवदे, हनुमंतराव कांबळे यांनी गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच यावेळी त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करण्यात आले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहून समता, सदभावना, सर्वधर्मसमभावनेचा संदेश दिला. या देशातील गरीब असो श्रीमंत माणूस असो या सर्वांना लोकशाहीचा मूलभूत अधिकार देण्याचे कार्य केले आहे. समानता देण्याचे कार्य केले आहे. देशातील सर्व समाजाकरीता त्यांनी काम केले आहे. युगपुरूषांनी घालून दिलेल्या मार्गाचा अवलंब आपण केला पाहिजे. गौतम बुद्धांचा संदेश आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुढचे हजारो वर्ष सर्वांना तारणार आहेत. तोच विचार हा आपला मजबूत पाया समजून सर्वांनी पुढे वाटचाल करावी.’
यावेळी माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, माजी उपनगराध्यक्ष प्रा. कृष्णा ताटे तसेच कु.विवेका बजरंग मखरे यांनी मनोगत व्यक्त केले.
नगरसेवक भरत शहा, अशोक इजगुडे, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, नगरसेवक जगदीश मोहिते, नगरसेवक दादासाहेब सोनवणे, गणेश महाजन, दादा पिसे, रमेश धोत्रे, सागर गानबोटे, पांडुरंग शिंदे, गोरख शिंदे, माऊली वाघमोडे, हमीद आतार, सुधीर मखरे, प्रा. श्रीनिवास शिंदे, प्रा. तानाजी कसबे उपस्थित होते. सूत्रसंचालन शिवाजी मखरे यांनी केले. आभार संदिपान कडवळे यांनी मानले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे