डॉ. दिनेश लोखंडे यांची ससून रुग्णालयामध्ये कोविड -१९ रुग्णांची स्वच्छेने सेवा

पुणे, दि. १२ जून २०२०: कोविड -१९ चे संकट देशभरात वाढत चालले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात त्याचा प्रभाव सर्वात जास्त बघण्यास मिळत आहे. देशात मुंबई आणि पुणे ही दोन शहरे सर्वात जास्त प्रभावित शहरांमध्ये आहे. त्यामुळे येथे वैद्यकीय सेवा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्या योगाने सरकारनेदेखील खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. याला दाद देत औंध मधील डॉक्टर दिनेश लोखंडे यांनी पुढाकार घेतला.

गेल्या दोन आठवड्यापासून ते पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये सेवा देत आहेत. दोन आठवड्यापर्यंत त्यांनी ससून रुग्णालयातील कोविड -१९ बाधित रुग्णांवर उपचार केले. दोन आठवड्यानंतर ते पुन्हा आपल्या घरी आले त्यावेळेस तेथील स्थानिक लोकांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले तसेच त्यांचा सत्कार देखील करण्यात आला.

डॉक्टर दिनेश लोखंडे हे औंध मधील एम्स हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय सल्लागार म्हणून काम पाहतात. या व्यतिरिक्त त्यांचे स्वतःचे रुग्णालय देखील आहे. औंध मधील श्रीराम नगर सोसायटीमध्ये रहिवासी असून घरी येताच सोसायटीमधील नागरिकांनी त्यांचे भावपूर्ण स्वागत केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा