डॉ. स्वप्निल ज. माने यांची ‘वॅक बुक ऑफ रेकॉर्डस’ मध्ये नोंद

पुणे, २१ डिसेंबर २०२०: कोरोना महामारी च्या काळात लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यातही २३ मार्च पासून लावण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे लोकांना भयंकर आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले होते. दरम्यानच्या काळात अनेक सामाजिक कार्यकर्ते व संस्थांनी अडचणीत सापडलेल्या लोकांना मदतीचा हात दिला होता. याप्रमाणेच ‘सामर्थ्य जनशक्ती संघटना’ यांच्याकडून देखील गरजवंतांना मदत करण्यात आली होती.

डॉ. स्वप्निल ज. माने हे या संघटनेचे अध्यक्ष असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेने लॉक डाऊन काळात तब्बल १,५०,००० हून अधिक गरजू लोकांना मदतीचा हात दिला होता. यादरम्यान त्यांनी अन्नपदार्थ, ब्लॅंकेट्स, किराणा, औषधे तसेच आर्थिक मदत यांसारखी सहायता गरजूंपर्यंत पोहोचवली. त्यांच्या या कार्याची दखल घेत वॅक बुक ऑफ रेकॉर्डस ने त्यांना सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले आहे.

सामर्थ्य जनशक्ती संघटनेच्या पूर्ण महाराष्ट्रात ठीक ठिकाणी शाखा आहेत व गेल्या काही वर्षांपासून ते अशाप्रकारचे सामाजिक कार्य करत आले आहेत. विशेष म्हणजे या संघटनेमध्ये कार्य करणारे स्वयंसेवक हे युवा आहेत. कोरोना सारख्या संकटाच्या काळात संघटनेतील युवकांनी केलेले हे कार्य उल्लेखनीय आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा