गोल पोस्ट इतर डॉ.लागूंवर गुरुवारऐवजी शुक्रवारी होणार अंत्यसंस्कार

डॉ.लागूंवर गुरुवारऐवजी शुक्रवारी होणार अंत्यसंस्कार

पुणे: ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे मंगळवारी (दि. १७) निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या गुरुवारी (दि. १९) ऐवजी शुक्रवारी (दि. २०) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याबाबत ज्येष्ठ अभिनेत्या आणि डॉ. लागू यांच्या पत्नी दीपा श्रीराम यांनी रूपवेध प्रतिष्ठानतर्फे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.
या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, डॉ. लागू यांच्या पार्थिवावर उद्या गुरुवारी (दि. १९) अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मात्र डॉ. लागू यांचा अमेरिकेत राहणारा मुलगा गुरुवारपर्यंत पुण्यात पोहोचू शकत नसल्यामुळे उद्या गुरुवार ऐवजी शुक्रवारी (दि. २०) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी उद्या सकाळी बालगंधर्व रंगमंदिर येथे ठेवण्यात येणार आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version