डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या कडून माजी आमदार सुरेश गोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

खेड, १० ऑक्टोबर २०२० : शिवसेनेचे खेड मतदार संघातील माजी आमदार श्री सुरेश गोरे यांचे आज दुःखद निधन झाले आहे. शिवसेनेच्या वतीने विधिमंडळातील त्यांच्या सहकारी विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.निलम गोऱ्हे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. श्री सुरेश गोरे यांनी त्यांच्या आमदारकीच्या सोबतच अनेक वर्षे समाजकार्य देखील केले होते. जिल्हापरिषद, पंचायत समिती मधील अनेक पदे त्यांनी भूषविले होती इतकेच नव्हे तर मोठ्याप्रमाणात खेड तालुक्यात महिलांची जागृती करण्यामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता.

उत्तम चारित्र्य, लोकांशी भेटण्यासाठी संवेदनशील स्वभाव, महिला सुरक्षेच्या प्रश्नावर तीव्र अशी बांधिलकी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत पूर्णपणे वचनबद्धता, शिवसैनिकांबद्दल आधार अत्यंत वेगळ्या प्रकारचे व्यक्तिमत्त्व असा मिलाफ त्यांच्या संपूर्ण कामात होता, अशा वाक्यात ना.डॉ.गोऱ्हे यांनी श्री सुरेश गोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना व्यक्त केली.

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी त्यांच्या हॉस्पिटलच्या व्यवस्थेसाठी स्वतः लक्ष घातले होते. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे सातत्याने त्यांच्या प्रकृतीच्या संदर्भात संपर्कात होते. परंतु कोरोनाच्या गंभीर संकटासमोर त्यांचा मुकाबला होऊ शकला नाही आणि त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या कार्यामध्ये आम्हा सर्वांचे नंतर सुद्धा लक्ष राहील त्यांच्या कुटुंबाबद्दल सहवेदना व्यक्त करून ना.डॉ.गोऱ्हे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा