डॉ. रघुनाथ माशेलकर यांना ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’ जाहीर

पुणे, २६ डिसेंबर २०२०: ‘आपल्या संस्कृती’ प्रतिष्ठानतर्फे दिवंगत पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी दिला जाणारा ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’ या वर्षी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, थोर विचारवंत पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर सर यांना सन्मानपूर्वक दिला गेला.

पुरस्काराचे यंदाचे तिसरे वर्ष असून यापूर्वी विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर जी , सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार जी यांना ‘अटल गौरव पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले आहे. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा अटलजींच्या जयंतीदिनी आज बालगंधर्व रंगमंदिर येथे राज्याचे माजी नेते, विरोधीपक्ष नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, पुणेरी पगडी आणि एक लाख रुपये गौरवनिधी असे आहे.

कोथरूड मतदार संघाचे आमदार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. खासदार श्री. गिरीशभाऊ बापट, भाजपा शहराध्यक्ष श्री. जगदीश मुळीक, आमदार श्री. सिद्धार्थ शिरोळे, माजी राज्यमंत्री श्री. दिलीप कांबळे, आमदार माधुरीताई मिसाळ, आमदार श्री. भीमराव तापकीर, आमदार सौ. मुक्ता टिळक, आमदार श्री. सुनील कांबळे, उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष श्ी. हेमंतजी रासने, सभागृह नेते श्री. गणेशजी बिडकर, भाजप ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्री. योगेशजी टिळेकर, भाजपा पुणे शहर प्रभारी श्री. धीरजजी घाटे, भाजपा संघटन सरचिटणीस श्री. राजेशजी पांडे यांची विशेष उपस्थिती होती.

पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांवर आधारित ‘गीत नया गाता हूँ’ या गीत, संगीत आणि नृत्यावर आधारित दृक-श्राव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संवाद पुणेची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर अटलजींच्या रचना सादर केले .अभिनेत्री भार्गवी चिरमुले नृत्य सादर केल्या. या कार्यक्रमाचे संयोजन सुनील महाजन यांनी केले असून नृत्य दिग्दर्शन निकिता मोघे यांचे होते.

कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियम आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून होणार असून कार्यक्रमस्थळी मास्क वितरण आणि सॅनेटायझेशनची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा