मॉरिशस मध्ये होणाऱ्या जागतिक छत्रपती शिवाजी महाराज विचार महोत्सवाच्या अध्यक्षपदी डॉ.श्रीमंत कोकाटे

26

पुणे, १५ जुलै २०२३ : जागतिक कीर्तीचे राजे आणि भारताची अस्मिता असलेले व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. यांच्या विविध विचार पैलूंवर आधारित जागतिक विचार महोत्सवाचे आयोजन भोर येथील शाहू फुले आंबेडकर विचार प्रसारक मंडळ, इंटरनॅशनल कल्चर अँड सोशल फोरम मॉरिशस आणि रवींद्रनाथ टागोर इन्स्टिट्यूट मॉरिशस यांच्या संयुक्त विद्यमानाने येत्या सप्टेंबर मध्ये आयोजित करण्यात आले आहे. या जागतिक विचार महोत्सवाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, इतिहास संशोधक डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांची निवड करण्यात आली आहे.

डॉ.कोकाटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचार पैलूंवर संशोधन केले असून ते इतिहास तज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, क्रांतिसिंह नाना पाटील या महामानवांच्या विचारांची पेरणी ते समाजातील तरुण वर्गात करत आले आहेत.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक लढ्यातील एक आश्वासक नाव म्हणून डॉ. कोकाटे प्रसिद्ध असून संविधानिक विचार लढ्याचे प्रणेते म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. त्यांची अनेक ग्रंथसंपदा प्रसिद्ध असून, प्रसिद्ध व्याख्याते म्हणूनही ते सर्वश्रुत आहेत. या विचार महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसारक मंडळाच्या वतीने मॉरिसच्या रवींद्रनाथ टागोर इन्स्टिट्यूट मध्ये पुतळाही बसविण्यात येणार आहे. डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांच्या अध्यक्षीय निवडीमुळे सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे. मॉरिशसमध्ये जागतिक छत्रपती शिवाजी महाराज विचार महोत्सव साजरा होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा