गोल पोस्ट महाराष्ट्र डॉ.वायकुळे यांच्याकडून पत्रकारांना चष्मा व मास्कचे वाटप

डॉ.वायकुळे यांच्याकडून पत्रकारांना चष्मा व मास्कचे वाटप

सोलापूर, दि. ५ जुलै २०२० : सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथील नेत्ररोगतज्ञ डाॅ.अनिल वायकुळे यांनी शहर परिसरातील कोरोनाच्या विषाणू संक्रमणाच्या संकटकाळात जीव धोक्यात घालून वार्तांकनाचे काम करणाऱ्या पत्रकारांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून चष्मा व मास्कचे वाटप करण्यात आले आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जीवाची पर्वा न करता वृत्त संकलनाचे काम करणा-या शहर व परिसरातील सर्व पत्रकारांना एक चष्मा व एक मास्क भेट देऊन प्रत्येकाने स्वतःची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी कोणकोणते व्यायाम, आसने यासह आहार कोणता घ्यावा व सूर्य नमस्काराचे महत्व पटवून दिले.

यावेळी दिवसातून एकदा तरी हळद घालून दुध पिण्याचा सल्ला त्यांनी दिला. यावेळी त्यांचे बंधू अमोल यांनी पत्रकारांच्या कार्य कर्तृत्वाचे आणि जागरूकतेबद्दल कौतुक केले, यावेळी सर्व पत्रकारांनी त्यांचे आभार मानले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version