LIC IPO- SEBI कडं सादर केला ड्राफ्ट, पॉलिसीधारकांना 3 कोटींहून अधिक शेअर्स मिळणार

LIC IPO Latest Update, 14 फेब्रुवारी 2022: सरकारने आज LIC IPO चा बहुप्रतिक्षित ड्राफ्ट बाजार नियामक सेबीकडं सुपूर्द केला. यासह अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अटकळांना पूर्णविराम मिळाला. LIC च्या या IPO मध्ये कंपनीच्या एकूण इक्विटीचा आकार 632 कोटी शेअर्सचा असेल.

डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक अॅसेट मॅनेजमेंट (DIPAM) च्या सचिवांच्या ट्वीटर हँडलवर रविवारी संध्याकाळी उशिरा सांगण्यात आलं की LIC IPO चा ड्राफ्ट पेपर सेबीला सादर करण्यात आला आहे. हा ड्राफ्ट पेपर सेबीच्या अधिकृत वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे. सेबीच्या वेबसाइटवरून ते डाउनलोड करून, आयपीओच्या तपशीलांची माहिती मिळू शकते.

LIC IPO च्या ड्राफ्ट पेपरनुसार एकूण इक्विटीची साइज 632 कोटी शेअर्स असणार आहे. या IPO द्वारे सरकार आपला 5 टक्के हिस्सा विकणार आहे. सध्या सरकारची LIC मध्ये 100% हिस्सेदारी आहे. या IPO मध्ये, LIC च्या पॉलिसीधारकांसाठी 10 टक्के हिस्सा राखीव असणार आहे. याचा अर्थ LIC पॉलिसीधारकांना LIC मध्ये बिड मिळण्याची अधिक शक्यता असते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा