द्राक्ष बागांना बसला नऊ हजार कोटींचा फटका

38

पुणे: द्राक्षबागा यंदा अतिरिक्त पावसाच्या संकटामुळे नष्ट झाल्या आहेत. सर्वात जास्त फटका नाशिक विभागातील बागांना बसला आहे. मागील हंगामात नासिक मधून ३८ हजार निर्यात योग्य बागांमधून शेतकऱ्यांना एक लाख अकरा हजार ६४८ निर्यात योग्य द्राक्ष पिकवली होती. यावर्षी कृषी विभागाने निर्यात योग्य द्राक्ष बागांची संख्या नव्वद हजारापर्यंत नेण्याचे लक्ष ठेवले होते. परंतु या वर्षीच्या सतत चालू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे हे लक्ष साधता येणार नाही. मात्र गेल्या हंगामा इतक्या बागा नोंदवल्या जातील असा विश्वास आम्हाला वाटतो, अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा