द्रौपदी मुर्मू – नव्या राष्ट्रपती, नवे रेकॉर्ड…

नवी दिल्ली, २१ जुलै २०२२: द्रौपदी मुर्मू, सध्या हे नाव जनमानसात चर्चेत आहे. भारत देशाच्या राष्ट्रपतीपदाची धुरा त्या लवकरच सांभाळणार आहेत. त्या निमित्ताने द्रौपदी मुर्मू यांच्या कारकिर्दीचा न्यूज अनकटने घेतलेला आढावा…

मूळच्या झारखंडच्या असलेल्या द्रौपदी मुर्मू या पेशाने शिक्षक आहेत. १९९४ पासून त्यांनी शिक्षकी पेशाला सुरुवात केली. शिक्षक आणि कारकून या पेशाने त्यांनी स्वत:ला समृद्ध केले.
द्रौपदी मुर्मू यांना श्यामचरण मुर्मू यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर दोन मुले आणि एक मुलगी झाली. मात्र नियतीने त्यांचे पती आणि दोन्ही मुले यांना हिरावून घेतले. त्यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. पण या धक्क्याने खचून न जाता रांचीच्या व्हिजन ऑफ प्रोग्रेस या एका कार्यक्रमाअंतर्गत आपल्या पतीचे आणि मुलांचे डोळे दान कले. तिथूनच त्यांना योगदानाची प्रेरणा मिळाली असावी.

त्यानंतर त्यांनी खचून न जाता निर्धाराने राजकारणात उडी घेतली. १९९७ मध्ये द्रौपदी मुर्मू या ओडिशाच्या रायरंगपूरच्या नगरसेवक पदावर निवडून आल्या.
त्यांनी एस.टी. मोर्चाच्या अध्यक्ष म्हणून काम पहाण्यास सुरुवात केली आणि याच एसटी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारी सदस्य म्हणून त्यांनी २०१५ ते २०१७ या काळात काम पाहिले.
२००० आणि २००९ मध्ये राईरंगपूर विधानसभेसाठी त्यांनी भाजपतर्फे निवडणूक लढवली. तिथूनच त्यांनी भाजपच्या आमदार म्हणून काम पहायला सुरुवात केली. हीच त्यांची भाजपामधली सुरुवात होती.
२००२ मध्ये द्रौपदी मुर्मू ओडीशा सरकारमध्ये मत्स्य आणि पशूपालन विभागात मंत्री म्हणून कार्यरत झाल्या.

२००६ मध्ये द्रौपदी मुर्मू या ओडीशाच्या अनुसुचित जाती जमातीच्या मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष झाल्या. त्यानंतर २००९ मध्ये त्या पुन्हा भाजपतर्फे निवडून आल्या.
२०१५ मध्ये त्या झारखंडच्या राज्यपाल म्हणून नियुक्त झाल्या.
आदिवासी महिला, आदिवासी जमाती यांच्यासाठी त्या कायम झटत राहिल्या. त्यांचे प्रश्न सोडवणे, त्यांना बळ देणे हाच त्यांच्या आयुष्याचा उद्देश होय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्रौपदी मुर्मू यांचे नाव घोषित केल्यानंतर त्यांच्या विरोधात यशवंत सिन्हा हे राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून उभे राहिले होते. द्रौपदी मुर्मू यांना ५४० मते मिळाली तर यशवंत सिन्हा यांना २०८ मते मिळाली. तर दुस-या फेरीत १३४९ मते मिळाली. तर यशवंत सिन्हा यांना ५३७ मते मिळाली. अखेर द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती झाल्यानंतर सर्वात कमी वयाच्या महिला आदिवासी राष्ट्रपती म्हणून मुर्मू यांच्या नावावर नवीन रेकॉर्ड जमा झाले आहे. त्यांच्या आयुष्याची पूंजी आता त्यांनी देशसेवेला वाहिली आहे, असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही.
अशा या हरहुन्नरी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज अनकटच्या शुभेच्छा….

न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा