मुंबई, १८ ऑक्टोबर २०२२ : बॉलीवूड अभिनेता अजय देवगन च्या ‘दृश्यम २’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते, आणि आता ट्रेलर पाहिल्यानंतर लोकांची उत्कंठा आणखी वाढली आहे.

‘दृश्यम २ ‘चा ट्रेलर हा २ मिनिटं २४ सेकंदाचा आहे, ट्रेलर मध्ये विजय सालगावकर आणि त्याचे कुटुंबीय दाखवण्यात आले आहेत. जवळपास सात वर्षानंतर पुन्हा एकदा विजयची केस उघडण्यात आली आहे. पण यावेळी विजयच्या प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी अक्षय खन्नाच्या खांद्यावर आहे, ट्रेलर मध्ये अक्षय खन्ना ,अजय देवगन आणि त्यांच्या कुटुंबासोबत माईंड गेम्स खेळताना दिसत आहे. ट्रेलरच्या शेवटी विजय कंटाळून आपला गुन्हा मान्य करत कॅमेरासमोर कबुलीजबाब देत असल्याचे दाखवण्यात आलं आहे.

‘दृश्यम २’ मध्ये अजय सह,अक्षयखन्ना ,तब्बू ,श्रेयासरण ,आणि इशिता दत्ता महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या निधनामुळे दिग्दर्शनाची धुरा अभिषेक पाठक यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तरी हा चित्रपट पुढील महिन्यात १८ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा